धक्कादायक : भर दिवसा रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला जंगलात नेवून मारहाण करत लुटले!

    दिनांक : 19-Aug-2022
Total Views |
जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लंघूशंकेसाठी रस्त्यावर थांबलेल्या दाम्पत्याला सात ते आठ भामट्यांनी जंगलात नेवून मारहाण करत विवाहितेच्या अंगावरील दागिने आणि रोकड जबरदस्तीने लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.
 
marhan
 
 
 
सविस्तर वृत्त असे कि, पंकज रामसिंग राठोड (वय २१, रा. जोंधनखेडा ता. मुक्ताईनगर) हे आपल्या पत्नीसह मुक्ताईनगर तालुक्यातील माळेगाव शिवारातील कालिंका माता मंदीराच्या पुढे बुधवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्याने जात होते. दरम्यान, दोघे दाम्पत्य लघुशंकेसाठी थांबले असता त्याचवेळी बहादू, तोरे, आणि प्रताप याच्यासह इतर ७ अनोळखी व्यक्तींनी येवून सदर दाम्पत्याला जंगलात नेवून बेदम मारहाण केली. तसेच राठोड यांच्या पत्नी सपना यांच्या आंगावरील दागिने व बाराशे रूपयांची रोकड असा एकुण ३७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाला जबरदस्तीने चोरून नेला. या प्रकरणी दाम्पत्याने मुक्ताईनगर पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.