नाशिक: कझाकिस्तानमध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अश्विनी देवरे यांनी विक्रमी कामगिरी करत तिरंगा मानाने फडकाविला.आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय खडतर अशा मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत यश प्राप्त करत देशाची मान आणखीन उंचावली गेली आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील एका महिला पोलिसाने (Women Police) हा विक्रम करत हे भव्य यश प्राप्त केलं आहे. नाशिक पोलीस आयुक्तालाच्या महिला पोलीस अमलदार अश्विनी देवरे यांनी ही कामगिरी केली आहे. कजाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला आणि कालबद्ध वेळेच्या आत स्पर्धा जिंकून त्यांनी आयर्नमॅन या स्पर्धेचा खिताब पटकवून विक्रमी कामगिरी करत तिरंगा मानाने फडकाविला.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील अतिशय खडतर अशा मानल्या जाणाऱ्या आयर्न मॅन स्पर्धेत त्यांनी राज्यासह संपूर्ण देशाचे नाव चमकवले आहे. त्यांच्या या यशाने नाशिक आणि महाराष्ट्रसह देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. स्पर्धा जिंकल्यानंतर त्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर आल्या, यावेळी नाशिक पोलीस आणि सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने देवरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पोलीस दलातील अतिशय व्यस्त दैनंदिनीतून वेळ काढून अश्विनी देवरे यांनी स्पर्धेची तयारी केली, आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली देखील.
अश्विनी देवरे यांचे पती गोकुळ नामदेव देवरे हे भारतीय सैन्य दलात 9 पॅरा फिल्ड या युनिटमध्ये श्रीनगर येथे तैनात आहेत. देवरे अपत्याला 12 आणि 7 वर्षांचे दोन मुले वीर देवरे आणि शौर्य देवरे असा त्यांचा परिवार आहे. या अगोदर तत्कालीन नाशिक पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंघल यांनी ही आयर्नमॅन स्पर्धा जिंकली होती. त्यांनतर पाहिल्यांदाच नाशिक पोलीस आयुक्तालयातील कर्मचारी अश्विनी देवरे यांनी ही आयर्नमॅनची स्पर्धा जिंकून यश संपादन केले आहे.