गणेश कॉलनीतील घटना ; अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

    दिनांक : 18-Aug-2022
Total Views |
जळगाव : गणेश कॉलनीत भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
 

acident 
 
 
सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील वनोली येथील रहिवाशी अरूण धनसिंग पाटील (वय-५६) हे आपल्या पत्नी व मुलासह शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात वास्तव्याला आहे. अरूण पाटील हे गणेश कॉलनीत एका ठिकाणी सेक्यूरीटी म्हणून नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे रात्री कामावर हजर होण्यासाठी मंगळवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता दुचाकीने जात होते. कामावर जात असतांना त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने येवून जोरदार धडक दिली. या धडकेत अरूण पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. गुरूवार १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रमाबाई, मुलगा धर्मराज आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.