आता पुन्हा एकदा सरपंच थेट जनतेमधून निवडून येणार; १३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

17 Aug 2022 15:53:06
सार्वत्रिक निवडणूकीतून होणार लोकनियुक्त सरपंच

जळगाव : राज्य निवडणूक आयोगातर्फे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आली. यात जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील ११ तर यावल तालुक्यात २ अशा एकूण १३ ग्रामपंचायतीं अंतर्गत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम सूचना जाहिर होणार आहे. या निवडणूकीव्दारे लोकनियुुक्त सरपंच तसेच सदस्य निवडले जाणार आहेत.
 
 
Sarpanch
 
राज्य निवडणूक आयोगातर्फे राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य मुख्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी जाहीर केला आहे. यात जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीद्वारे सर्वसामान्यांकडून लोकनियुक्त सरपंच निवडले जाणार आहेत.

या ग्रामपंचायतीत होणार निवडणूक
 
जिल्ह्यातील यावल तालुक्यात मालोद आणि परसाडे तसेच चोपडा तालुक्यातील पिंपरी, बोरअजंटी, देव्हारी, कर्जाणे, मेलाणे, मोहरद, सत्रासेन, उमर्टी, वैजापूर, कृष्णापूर आणि मोरचिडा या १३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
 
१८ ऑगस्ट निवडणुकीची नोटीस प्रसिद्धी, २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर नामनिर्देशपत्रे दाखल करणे, २ सप्टेंबर-उमेदवारी अर्जांची छाननी, ६ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघरी तर १८ सप्टेंबर रोजी स. ७.३० ते सायं. ५.३० वाजेदरम्यान मतदान आणि १९ रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0