दुर्दैवी... जम्मू-काश्मीरमध्ये आयटीबीपी (ITBP) जवानांची बस दरीत कोसळून ६ जवान शहीद, अनेक जण जखमी

    दिनांक : 16-Aug-2022
Total Views |
जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये 'आयटीबीपी'च्या (ITBP) जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या बसमध्ये ३९ जवान होते, तर बसमधील ६ जवान शहीद झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
 
 
 

accident
 
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झालेले आयटीबीपीचे सर्व जवान हे अमरनाथ यात्रेच्या (Amarnath Yatra) ड्यूटीवर तैणात होते. अमरनाथकडून पुन्हा आपल्या कॅम्पकडे परतत असताना पहेलगाम जिल्ह्यातील चंदनवाड या भागात ही दुर्घटना घडली.
 
ही बस चंदनवाडीहून पहलगामला (Chandanwari to Pahalgam) जात होती. दरम्यान, बसचा ब्रेक निकामी होऊन बस दरित कोसळली. या बसमध्ये ३९ जवान होते. त्यापैकी ३७ आयटीबीपीचे होते, तर २जम्मू-काश्मीर पोलिसांचे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ३९ जवानांपैकी ६ जवान शहिद झाले आहेत.
 
आणखी किती जवान सापडले आणि किती बेपत्ता आहेत याबाबतची माहिती समोर आलेली नसूव सर्च ऑपरेशन सुरु आहे. दरम्यान, या बसमधील अनेक जवान जखमी झाले असून या जवानांना उपचारासाठी श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात (Srinagar Military Hospital) दाखल करण्यात आले आहे. तसंच अधिकची माहिती नंतर देण्यात येईल," असं काश्मीर झोन पोलिसांनी सागिंतलं आहे.