गतिरोधकावर दुचाकी आदळल्याने जळगाव येथील वृद्धेचा मृत्यू

पाचोरा तालुक्यातील लोहारी गावाजवळील घटना

    दिनांक : 16-Aug-2022
Total Views |
पाचोरा : गतिरोधकावर मोटारसायकल आदळल्याने रस्त्यावर पडून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्घटना सोमवारी घडली. सुशीलाबाई दिनकर बडगुजर (६४) असे मयत महिलेचे नाव आहे.
 

Accident 2 
 
प्रमोद दिनकर बडगुजर (रा. सुप्रीम कॉलनी, एम.आय.डी.सी., जळगाव) हे पिंपळगाव (हरेश्वर) येथील आपल्या शालकाच्या मुलाचा नवस असल्याने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आई सुशीलाबाई दिनकर बडगुजर (६४) यांना घेऊन मोटारसायकल (एमएच-१९/डीबी-११८८) वरून सोमवारी सकाळी निघाले होते.
 
सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील लोहारी गावानजीक त्यांची मोटारसायकल ही स्पिड ब्रेकरवर आदळली. मागे बसलेल्या सुशिलाबाई बडगुजर या खाली पडल्या. त्यांच्या डोक्यास जबर मार लागल्याने सुशीलाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी सुशीलाबाई यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा गुन्हा पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.