जर तुमच्याकडे खराब झालेला तिरंगा असेल तर तो चुकूनही फेकू नका; याठिकाणी करा जमा…

16 Aug 2022 18:13:32
जळगाव : केंद्र तसेच राज्य शासननिर्देशानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त यावर्षी जिल्हाभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात आले. या अभियानास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत घरोघरी तिरंगा फडकविला. दरम्यान हवेमुळे, पावसामुळे अथवा अन्य कारणामुळे राष्ट्रध्वजाला क्षती पोचली असेल, असे क्षतीग्रस्त राष्ट्रध्वजाला महापालिकेत जमा करता येणार आहे. पालिकेच्या चार प्रभाग समिती कार्यालयात बुधवारपासून ध्वज संकलित केले जाणार असल्याचे मनपा उपायुक्त श्याम गोसावी यांनी म्हटले आहे.
 

har-ghar-tiranga-campaign 
 
याठिकाणी स्वीकारले जातील क्षतीग्रस्त राष्ट्रध्वज
 
नागरिकांनी प्रभाग समिती १ - सतरा मजली प्रशासकीय इमारत ६ वा मजला, प्रभाग समिती २ - पंचमुखी हनुमान मंदिरांच्या जवळ मनपा अंतर्गत लाठी शाळा, प्रभाग समिती ३ - मेहरुण उद्यानालगत असलेले महापालिकेचे टी.बी. रूग्णालय आणि प्रभाग समिती ४ - रामानंद रोड. गिरणा पाण्याची टाकी अशा चार ठिकाणी केवळ नष्ट करण्यायोग्यच ध्वज आणून द्यायचे आहे. चांगले ध्वज आणू नयेत, असे आवाहन मनपा उपायुक्त गोसावी यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0