कर्तव्यरत अधिकारी कर्मचार्‍यांना भाजपा महानगर महिला आघाडीतर्फे बांधली राखी

10 Aug 2022 13:28:14

 
जळगाव - रक्षाबंधनानिमित्त शाळा-महाविद्यालयांना स्थानिक स्तरावर सुटी असली तरी अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांना मात्र या दिवशी सुटी नसते. त्यामुळे ‘एक धागा भावासाठी’ या उद्देशाने भाजपा महानगर महिला आघाडीतर्फे आज गणेश कॉलनी तसेच प्रतापनगर कक्षातील कर्तव्यावर असलेल्या महावितरण अधिकारी कर्मचार्‍यांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधण्यात आली.
 
 

rakhi1
 
 
 
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, उपाध्यक्षा सरोज पाठक, सरचिटणीस रेखा वर्मा, रेखा कुलकर्णी, निला चौधरी, ऋतुजा संत, संगीता पाटील, नगरसेविका गायत्री पाटील आदी महिला पदाधिकार्‍यांतर्फे राखी बांधण्यात आली.
 
यावेळी सहायक अभियंता भूषण भोगे, आर.एन.पाटील, तंत्रज्ञ भरतरीनाथ पी. अनुसे, यंत्रचालक सतीश सपकाळे, सुनिता सुर्यवंशी, नलिनी तायडे, विजय चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, संजय पवार, मनोज गुरव आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय मराठे यांनी केले. यावेळी अधिकारी कर्मचार्‍यांतर्फे भाजपा महानगर महिला आघाडी पदाधिकार्‍यांना ओवाळणी म्हणून भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
Powered By Sangraha 9.0