भयंकर ! शॉर्ट सर्किटमुळे खासगी रुग्णालयात अग्निचा हाहाकार, 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू

    दिनांक : 01-Aug-2022
Total Views |
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
 
नवी दिल्ली : एका खासगी रुग्णालयात भीषण अग्नितांडव झाला. आगीची माहिती मिळताच तातडीनं 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. आगीचं कारण अद्याप समोर आलं नाही.
 
 

aag
 
 
 
या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
 
आगीमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तळमजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या आगीत दोन जण गंभीर जखमी आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.