'या' दोन माजी नगराध्यक्षांनी घेतली गिरीश महाजन यांची भेट

09 Jul 2022 19:22:03
जळगाव : नगरपालिका निवडणूकीचे सूप वाजले आहे. मतदार याद्या प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरु आहे.या घडामोडी घडत असतांना राज्यात सत्तांतर झाले असल्याने, पुन्हा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे वारे वाहू लागले आहे. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर माजी मंत्री गिरीश महाजन यांचे मंत्रीपद निश्चित मानले जात आहे. त्यानिमित्ताने रावेरातील मंडळीने त्यांची जामनेर येथे भेट घेवून, रावेरातील राजकीय घडामोडीबाबत चर्चा केली आहे. या भेटीत काय घडले, याबाबत गुप्तता पाळली जात असली तरी या भेटीत दोन माजी नगराध्यक्ष सामील असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
 


Raver1 
 
नव्याने राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमुळे अनेक बदल होत असतांना, नव्या मंत्रीमंडळात माजी मंत्री गिरीश महाजन यांची वर्णी लागणार असल्याने, त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी रावेरचे माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, शीतल पाटील यांनी भेट घेवून राजकीय परिस्थितीबाबत चर्चा घडवून आणल्याने रावेरात चर्चेला ऊत आला आहे.
 
 
Raver
 
याबाबत शीतल पाटील यांना विचारले असता, त्यांनी हि केवळ सदिच्छा भेट होती असे सांगून या भेटी बाबत होणार्या चर्चेवर पडदा टाकला आहे. यावेळी अरुण शिंदे, दिलीप पाटील, विकास देशमुख,पंकज वाघ उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0