मंदिरात दर्शन घेण्यासाठी धर्माचे बंधन नाही- उच्च न्यायालय

    दिनांक : 09-Jul-2022
Total Views |


तामिळनाडू : मद्रास उच्च न्यायालयाने High Court एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान म्हटले आहे की, इतर कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला हिंदू देवतेवर श्रद्धा असेल तर त्याला त्या देवतेच्या मंदिरात जाण्यापासून रोखता येणार नाही. न्यायमूर्ती पीएन प्रकाश आणि न्यायमूर्ती आर हेमलता यांच्या खंडपीठाने High Court एका जनहित याचिकेवर (पीआयएल) सुनावणी करताना हा निर्णय दिला. तिरुवत्तर येथील अरुलमिघु आदिकेसवा पेरुमल तिरुकोविल येथील कुंबाबिशेगम उत्सवात बिगर हिंदूंना सहभागी होण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती.
 
 

court

 
सी सोमण नावाच्या High Court व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. किंबहुना, कुंभबिशेगम उत्सवाच्या आयोजनासाठी प्रसारित केलेल्या निमंत्रण पत्रात एका मंत्र्याच्या नावाचा उल्लेख आहे, जो ख्रिश्चन आहे. त्याआधारे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. जन्मतःच ख्रिश्चन असलेल्या डॉ केजे येसुदास यांनी गायलेली भक्तिगीते विविध हिंदू मंदिरांमध्ये वाजवली जातात. नागौर दर्गा आणि वेलंकन्नी चर्चलाही मोठ्या संख्येने हिंदू उपासक नियमितपणे कोणत्याही आक्षेपाशिवाय भेट देतात. जेव्हा असे मोठे धार्मिक उत्सव होतात High Court तेव्हा प्रत्येक व्यक्तीची धार्मिक ओळख तपासणे आणि नंतर त्याला मंदिरात प्रवेश देणे अधिकाऱ्यांना अशक्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
 
कोर्टाने म्हटले आहे की,High Court “आमच्या मते, जेव्हा मंदिरात कुंभबिशेगमसारखा सार्वजनिक उत्सव साजरा केला जातो तेव्हा मंदिरात प्रवेश देण्यासाठी प्रत्येक भक्ताची धार्मिक ओळख सत्यापित करणे अधिकाऱ्यांना अशक्य होते. शिवाय, जर दुसर्‍या धर्मातील व्यक्ती एखाद्या विशिष्ट हिंदू देवतेवर विश्वास ठेवत असेल तर त्याला रोखता येत नाही किंवा मंदिरात त्याच्या प्रवेशावर बंदी घालता येत नाही.” High Court कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला हिंदू धर्मातील विशिष्ट देवतेवर श्रद्धा असेल आणि ती त्याला भेट देऊ इच्छित असेल तर त्याला त्या देवतेच्या मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध किंवा बंदी घालता येणार नाही. असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.