राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानात प्रवेश करत आंदोलक आक्रमक

09 Jul 2022 15:29:44
कोलंबोमध्ये तणावाचे वातावरण; 'गो होम गोटा'च्या घोषणा देत आंदोलक राष्ट्रपती भवनात
 
कोलंबो: श्रीलंका गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात पेट्रोल, खाद्यपदार्थ आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दुपारी एकच्या सुमारास आंदोलक राष्ट्रपतींच्या शासकीय निवासस्थानी घुसू लागले. काही आंदोलक मुख्य गेटवर चढून आवारात घुसले. राजधानी कोलंबोमधील सरकारविरोधी निदर्शकांनी आज शनिवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानात प्रवेश केला. आंदोलक 'गोटा गो होम'च्या Go Home Gota घोषणा देत होते. राष्ट्राध्यक्ष राजपक्षे सुरक्षित स्थळी गेले आहेत. मात्र, राष्ट्रपती कुठे आहेत याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. कोलंबोमध्ये तणावाचे वातावरण आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले आहे. रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबारही केला.
 
 

gotabai
 
 
 
 
दरम्यान, Go Home Gota पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. पोलिसांच्या कारवाईत अनेक लोक जखमीही झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलक राष्ट्रपती भवनात खुर्च्यांवर बसून स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना दिसत आहेत. वाढत्या किमती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याविरोधात श्रीलंकेत अनेक दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. निदर्शनात सहभागी होण्यासाठी देशाच्या अनेक भागातून लोक कोलंबोला पोहोचले आहेत. आंदोलक Go Home Gota राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
 
आंदोलनाच्या ठिकाणी लष्कराचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी संचारबंदी लागू केली आहे. गाले क्रिकेट स्टेडियमबाहेरही मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते. येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे.
Powered By Sangraha 9.0