म्हसावद पुलाच्या बांधकामाच्या नावाखाली अवैध वाळूचा साठा

08 Jul 2022 19:26:56
जळगाव : म्हसावद येथे पुलाच्या बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वाळूचा साठा आढळून आला आहे. तक्रारीनंतर महसूल विभागाने वाळू साठ्यावर कारवाई करून पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.
 
Mhasawad
 
जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. यासाठी लागणाऱ्या वाळूचा साठवणुकीचा ठेका देण्यात आला आहे. शासकीय कामासाठी वापरण्यात येणारी वाळू ही जळगाव शहरात अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महसूल विभागाला मिळाली होती. तक्रारीची दखल घेत महसूल विभागाच्या पथकासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पुलाच्या कामावर धडकले. यावेळी महसूल विभागाचे मंडळाधिकारी, तलाठी यांनी पंचनाम्याच्या कारवाईवाला सुरूवात केली आहे. संध्याकाळपर्यंत २५० ब्रास वाळू आणि ९ ब्रास खडी यांचा पंचनामा करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0