आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या खाली ; काय? पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार.. .

    दिनांक : 07-Jul-2022
Total Views |
दिल्ली : जागतिक मंदीच्या काळात भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरण सुरूच असून आता ते प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आले आहे.
 
 
 
 
petrol
 
 
 
सध्या कच्चे तेल तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर गुरुवारीही त्याची किंमत खाली आली. क्रूडच्या किमती कमी झाल्यामुळे देशात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे.
 
तीन महिन्यांतील नीचांकी पातळी
 
बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे आता किंमत तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. गुरुवारी तेलाच्या किमती घसरल्या. याचे कारण असे की, संभाव्य जागतिक मंदीच्या भीतीने तेलाच्या मागणीबाबत चिंता वाढली आहे. ब्रेंट क्रूड LCOc1 फ्युचर्स 71 सेंटने घसरून $99.98 प्रति बॅरल झाले. WTI क्रूड CLc1 फ्युचर्स 62 सेंटने घसरून $97.91 प्रति बॅरल झाले.
 
उत्पादन आणि विक्रीची चिंता
 
मंगळवारी WTI क्रूड 8 टक्क्यांनी आणि ब्रेंट क्रूड 9 टक्क्यांनी घसरले. एसपीआय अॅसेट मॅनेजमेंटचे व्यवस्थापकीय पार्टनर स्टीफन इन्स यांनी म्हटले की, उत्पादन आणि वापराविषयीच्या चिंता वाढल्यामुळे तेलाच्या किमती खाली आल्या आहेत. बाजारातील स्त्रोतांवर विश्वास ठेवला तर, बुधवारच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की गेल्या आठवड्यात यूएस क्रूडचा साठा सुमारे 3.8 दशलक्ष बॅरलने वाढला आहे, तर गॅसोलीनचा साठा 1.8 दशलक्ष बॅरलने कमी झाला आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या काळात, क्रूडची किंमत 2008 च्या उच्च पातळीवर म्हणजेच प्रति बॅरल $ 139 वर पोहोचली. मात्र, त्यानंतर त्याची किंमत कमी झाली आणि आता क्रूड 100 डॉलर प्रति बॅरलवर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती एक डॉलरने वाढल्या तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 50 ते 60 पैशांनी वाढतात. त्याचप्रमाणे क्रुडच्या किमतीत घट झाल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही कपात होण्याची शक्यता आहे.
 
क्रूडमुळे इंधनात वाढ
 
भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर ठरवण्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूडचा दर महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेष म्हणजे, भारत कच्च्या तेलाचा मोठा आयातदार आहे आणि 85 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल बाहेरून खरेदी करतो. भारताला आयात कच्च्या तेलाची किंमत अमेरिकन डॉलरमध्ये मोजावी लागते. अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या मजबूतीमुळे देशांतर्गत पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर परिणाम होतो, म्हणजेच इंधन महाग होऊ लागते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर भारताचे आयात बिलही वाढते.