सामान्यांना महागाईचा आणखी एकदा चटका : अन्नधान्य, डेअरी उत्पादने महागणार !

07 Jul 2022 18:00:03
18 जुलैपासून पाच टक्के जीएसटी लागणार
 
मुंबई : महागाईने होरपळलेल्या जनतेला आता एका मागून एक महागाईचे चटके बसत आहे. आता आणखी अन्नधान्य आणि  डेअरी उत्पादनावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलने घेतला आहे. जीएसटी कौन्सिलच्या 28 आणि 29 जून रोजी चंदीगडमध्ये झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या वस्तूंवरील करात वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्याचबरोबर अन्नधान्य, लस्सी, दही यार‘या रोजच्या जेवणातील पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली होती. या शिफारशी करण्यात आलेले जीएसटीचे दर 18 जुलैपासून लागू करण्यात येणार आहेत, असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
 

dairy-products
 
 
आतापर्यंत फक्त ब्रॅन्डेड आणि पाकिटबंद धान्यपदार्थांवर जीएसटी लावण्यात येत होता, परंतु, आता रिटेल स्वरूपात पॅकिंग करून विकण्यात येणार्‍या पदार्थांवर पाच टक्के जीएसटी लागू करण्याची शिफारस करण्यात आली. त्यामुळे आधीच महागाईत होरपळणार्‍या सामान्यांना आणखी त्रासाचा सामना करावा लागणार आहे. या जीएसटीचा परिणाम ग्राहकांवर होणार असल्याचे व्यापारी संघटनांनी म्हटले आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्स महाराष्ट्र आणि द पूना मर्चंट चेंबर्स या व्यापार्‍यांच्या संघटनांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला विरोध करायचे ठरवले आहे.
Powered By Sangraha 9.0