सहिष्णुतेचा परिणाम

    दिनांक : 06-Jul-2022
Total Views |
हिंदूंना मारले तरी हिंदूंनी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ मात्र म्हणायचे नाही, अशी ‘टाईम’ मॅगझिनची भूमिका. यातूनच ‘टाईम’मॅगझिनचा हिंदूद्वेष किती खालच्या पातळीला गेलेला आहे, त्याचा दाखला मिळतो. पण, धर्मांध मुस्लीम असो वा ‘टाईम’ मॅगझिन असो वा लीना मणिमेकलाई असो, यांचा हिंदूद्वेष किती दिवस चालेल? जोपर्यंत हिंदू शांत, सहिष्णू आहे तोपर्यंत, नंतर? 
 

hindu 
 
 
देशात एकाचवेळी मोहम्मद पैगंबरांबद्दल हदीसमध्येच लिहिलेल्या गोष्टी सांगितल्या, तर हिंदूंचा शिरच्छेद केला जातो, तर दुसरीकडे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांना मात्र कला आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली अपमानित केले जाते. ज्ञानवापी प्रकरणात सर्वेक्षणादरम्यानसर्वेक्षकांना वजुखान्यात शिवलिंग आढळले तरी त्याला मुस्लीम पक्षाने कारंजा ठरवण्याचा प्रकार केला. त्यावरुनच एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान, ‘मुस्लीम पॉलिटिकल काऊन्सिल ऑफ इंडिया’चे अध्यक्ष डॉ. तस्लीम रहमानी यांनी शिवलिंगाला ‘फवारा’ म्हणत अपमान केला. त्यांच्या असभ्य भाषेने भावना दुखावल्या गेलेल्या नुपूर शर्मांनी सही बुखारीसह इतरही हदीसमध्ये लिहिलेली, झाकीर नाईक सर्दैव मोठ्या अभिमानाने सांगत असलेली व सौदी अरेबियाचे मौलाना असीम अल हकीम यांनी अनेकदा मान्य केलेली मोहम्मद पैगंबरांविषयीची गोष्ट सांगितली.
 
तिथून पुढे मात्र इस्लामी कट्टरपंथीयांनी देशाची परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला, दगडफेक, जाळपोळ, दंगलीसह मशिदी-मशिदींतून नुपूर शर्मांना मारुन टाकण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या, तर हिंदूंकडूनही प्रत्युत्तरादाखल नुपूर शर्मांना समर्थन दिले गेले, पण प्रकरण तेवढ्यावर थांबले नाही. डॉ. तस्लीम रहमानी यांनी शिवलिंगाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध न करणार्‍या धर्मांध मुस्लिमांनी नुपूर शर्मांचे समर्थन करणार्‍यांच्या हत्येचा मात्र सिलसिला सुरू केला. उदयपूरमधील कन्हैयालाल तेली या शिवण व्यावसायिकाची तर अमरावतीतील उमेश कोल्हे या मेडिकल स्टोअर व्यावसायिकाची इस्लामी कट्टरपंथीयांनी गळा चिरुन केलेली हत्या त्याचाच भाग. इतकेच नव्हे, तर धर्मांध मुस्लिमांनी नुपूर शर्मांचे समर्थन केल्याने अजूनही डझनभर हिंदूंना गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा करण्याची धमकी दिलेली आहेच. पण, त्याचवेळी देशात कलात्मकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवदेवतांवर टीका टिप्पणी करण्याचा, त्यांचे निषेधार्ह चित्रण करण्याचा प्रकार सुरुच आहे. विशेष म्हणजे, मोहम्मद पैगंबराविषयीची कथा उच्चारल्याने नुपूर शर्मांना चुकीचे ठरवणारी व इस्लामी कट्टरपंथीयांना पाठीशी घालणारी जमात हीच आहे, जी स्वतः हिंदूंच्या आस्थेचा कधीही विचार करत नाही.
 
चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाईंच्या ‘काली’ डॉक्युमेंटरीच्या पोस्टरवरुन त्यामुळेच वाद सुरु झाला आहे. मणिमेकलाईंनी कालीमातेच्या अवतारात दिसणार्‍या महिलेला सिगारेटचे झुरके मारताना दाखवले असून, कालीमातेच्या एका हातात ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाचा झेंडाही दिला आहे. पण, हिंदूंच्या कोणत्याही धर्मग्रंथात काली माता सिगारेट पित असल्याचे लिहिलेले नाही वा ‘एलजीबीटीक्यू’चाही उल्लेख नाही. तरीही लीना मणिमेकलाईंनी तसे दाखवले, कारण त्यांना मनापासून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या होत्या. मणिमेकलाईंचा इतिहास व वर्तमान हिंदूद्वेषाने भरलेला आहे. गुजरात दंगलीचे भांडवल करून स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍या तिस्ता सेटलवाड यांना अटक करण्यात आली, तर लीना मणिमेकलाईंना भीषण दुःख झाले. इतकेच दुःख त्यांना सर्दैव हिंदू देवदेवतांवर गलिच्छ भाषेत लिहिणार्‍या ‘अल्ट न्यूज’च्या मोहम्मद जुबैरला अटक केल्यावरही झाले. पण, आज कलेचे लेबल लावून कालीमातेचा अंधाधुंद अपमान करणार्‍या मणिमेकलाईंना नुपूर शर्मांनी सांगितलेली गोष्ट इस्लामच्याच धर्मग्रंथांत आहे, असे ठणकावून सांगावेसे वाटले नव्हते. म्हणजेच, एकाच विषयावरील दोन वेगवेगळ्या प्रकरणात तथाकथित उदारमतवाद्यांच्या भूमिका किती दुटप्पी असतात, त्याचे हे जीवंत उदाहरणच. तरीही उदारमतवाद्यांचे टोळके स्वतःला प्रामाणिक, धाडसी व बौद्धिकतेचे मूर्तीमंत म्हणून दाखवत असतील, तर त्याच्याइतका दुसरा कुठला विनोदी प्रकार नसेल.
 
मात्र, यापुढचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. मोहम्मद पैगंबरांचा कथित अपमान झाला, तर धर्मांध मुस्लिमांनी ठार मारण्याच्या धमक्या दिल्या व त्या प्रत्यक्षात आणल्याही. उमेश कोल्हे यांचा तर त्यांच्याच अतिशय जवळच्या मित्राने जीव घेतला. ज्या मित्राच्या बहिणीच्या विवाहापासून मुलांच्या दाखल्यापर्यंतची मदत केली त्यानेच जुनी सर्वप्रकारची मदत विसरुन इस्लामसाठी सहा-सात जणांच्या साथीने उमेश कोल्हेंना मारुन टाकले. पण, हिंदूंनी अजूनही लीना मणिमेकलाईंना ‘गुस्ताख-ए-काली माँ की एक ही सजा, सर तन से जुदा’ची धमकी दिलेली नाही. आता याला हिंदूंचा सहिष्णुपणा म्हणावा की काय? हिंदूंचा आतापर्यंतचा स्वभाव पाहता याला ते सहिष्णुताच म्हणतील. ज्या सहिष्णुतेने हिंदूंना अफगाणिस्तानातून संपवले, पाकिस्तानातून संपवले, बांगलादेशातून संपवले, काश्मीरसह देशातील अर्धा डझन राज्यात अल्पसंख्य करून टाकले, त्याच सहिष्णुतेचा मोठेपणा हिंदू इथेही मिरवत राहतील. पण, हीच सहिष्णुता आता हिंदूंच्या जीवावर उठली आहे. कन्हैयालाल आणि उमेश कोल्हेंच्या हत्येनंतर ‘हिंदू लाईव्हज मॅटर’सारखी घोषणाही तुम्ही देऊ शकत नाही, असे ‘टाईम’ मॅगझिन त्यामुळेच सांगताना दिसत आहे.
 
कन्हैयालाल यांच्या कत्तलीनंतर राजस्थानमध्ये ठिकठिकाणी हिंदूंनी खरीखुरी शांततापूर्ण निदर्शने केली, उमेश कोल्हेंच्या हत्येनंतरही अमरावतीत हिंदूंनी निषेध व्यक्त केला. याचवेळी हिंदूंनी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’च्या घोषणा दिल्या. पण, ‘टाईम’ मॅगझिनला त्याने चांगल्याच मिरच्या झोंबल्या. कन्हैयालाल व उमेश कोल्हेंचा गळा चिरण्याविरोधात शब्दही न काढणार्‍या ‘टाईम’ मॅगझिनला ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ची घोषणा धोकादायक, खतरनाक वाटू लागली. सान्या मन्सूर या महिला पत्रकाराने उलट इस्लामी कट्टरपंथीयांचीच बाजू घेतली. नुपूर शर्मांच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याने इस्लामी कट्टरपंथीयांच्या संतापाला कन्हैयालाल यांनी निमंत्रण दिल्याचे, सान्य मन्सूर यांनी लिहिले. म्हणजे, इथे कन्हैयालाल वा नुपूर शर्मांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा कोणीही विचार केला नाही, त्यांच्याविषयी कोणीही उदारमतावादी विचार केला नाही, तर विचार केला तो धर्मांध मुस्लिमांचा! तेवढे करुनही त्यांनी हिंदूंना मारले तरी हिंदूंनी ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ मात्र म्हणायचे नाही, अशी ‘टाईम’ मॅगझिनची भूमिका. यातूनच ‘टाईम’मॅगझिनचा हिंदूद्वेष किती खालच्या पातळीला गेलेला आहे, त्याचा दाखला मिळतो. पण, धर्मांध मुस्लीम असो वा ‘टाईम’ मॅगझिन असो वा लीना मणिमेकलाई असो, यांचा हिंदूद्वेष किती दिवस चालेल? जोपर्यंत हिंदू शांत, सहिष्णू आहे तोपर्यंत, नंतर? एक ना एक दिवस क्रियेला प्रतिक्रिया उमटेलच...