धक्कादायक ... नाशिकच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात आढळले वन्यप्राण्यांचे अवयव !

05 Jul 2022 16:49:25
नाशिकच्या सुप्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानावर वनविभागाची धाड
 
नाशिक:   रविवार कारंजा वरील एका प्रसिद्ध आयुर्वेदिक दुकानात वनविभागाने धडा टाकली असून या कारवाईत वन्यप्राण्यांचे अवयव आढळून आल्याची धक्कादायक समोर आली आहे. सध्या या दुकानात आणखी तपास करण्यात असून नेमके अवयव कुठल्या वन्यप्राण्याचे याचा तपास वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहे.
 
 

shop
 
 
नाशिक शहरातील रविवार कारंजा हा परिसर आयुर्वेदिक औषधांच्या दुकानांसाठी प्रसिद्ध आहे,. त्यातही तेली गल्लीतील दगडू तेली या नावाने असणाऱ्या आयुर्वेदिक दुकानांत नागरिकांची नेहमी गर्दी असते. अनेकदा नाशिकबाहेरील नागरिक या ठिकाणी आयुर्वेदिक औषधांसाठी येत असतात, मात्र येथील काही दुकानांत आयुर्वेदिकच्या नावाखाली वन्यप्राण्यांचे अवयव विक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार रविवार कारंजा परिसरात तेली गल्लीतील दीपक सुरेश चांदवडकर यांच्या मालकीच्या सुकामेवा व काष्ट औषधी दुकान नंबर तीन मध्ये वनविभागाने धाड टाकली.
 
वनविभागाला वन्यप्राण्यांचे अवयव विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरएफओ विवेकी भदाणे यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी, व राउंड स्टाफ च्या पथकाने दुकानावर छापा टाकला. या कारवाईत वन्यप्राण्यांचे विविध अवयव आढळून आल्याचे निदर्शनास आले. धाडीत मिळून आलेले वन्य प्राण्यांचे अवयव अधिक तपासासाठी प्रयोग शाळेत आले पाठवण्यात आले आहेत. तसेच वनखात्याने वन्यजीव संरक्षण च्या नुसार दीपक चांदवडवर यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान आरएफओ विवेक भदाणे म्हणाले कि, सध्या कारवाई करण्याचे काम सुरु असून तसेच वन्यप्राण्यांचे अवयव प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांची शहनिशा कर्णयचे काम सुरु आहे. शिवाय अशा पद्धतीने कोणी वन्यप्राण्यांची तस्करी करत असेल, तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
 
वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२ अंतर्गत अनुसूची-१ मध्ये अनेक वन्यप्राण्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा वन्यजीवांची त्यांच्या अवयवांसाठी अथवा अन्य कोणत्याही उद्देशाने शिकार करणे गंभीर गुन्हा आहे. या प्रकारचा गुन्हा सिद्ध झाल्यास गुन्हेगाराला सात वर्षांचा कारावास किंवा २५ हजारांचा दंड अथवा दोन्ही प्रकारची शिक्षा गुन्ह्याचे स्वरूप बघता न्यायालयाकडून सुनावली जाऊ शकते.
Powered By Sangraha 9.0