धक्कादायक ...एकाच कुटुंबातील पाच मुलांचा मृत्यू

    दिनांक : 31-Jul-2022
Total Views |
श्रीगंगानगर : children राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात झालेल्या एका वेदनादायक आणि मोठ्या अपघातात एकाच गावातील पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. अपघातात बळी पडलेली दोन्ही मुले सख्खे भाऊ होते. अपघातानंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. घरच्यांच्या आक्रोशाने संपूर्ण गाव हादरून गेले. पोलिसांनी डिग्गीतून मृतदेह काढून रामसिंगपूर रुग्णालयाच्या शवागारात ठेवला. घटनास्थळी व रुग्णालयात ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली आहे.
 
 

mrutu
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हृदयद्रावक घटना श्रीगंगानगरच्या अनुपगड उपविभागातील रामसिंगपूर पोलीस स्टेशन हद्दीतील उदासर गावात घडली. तेथे दुपारी शेतात बांधलेल्या पाण्याच्या टाकीत बुडून ५ निष्पाप बालकांचा मृत्यू झाला. अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये २ मुले आणि ३ मुलींचा (children) समावेश आहे. सर्व मुले एकाच कुटुंबातील होती. अपघातात ठार झालेली दोन्ही मुले सख्खे भाऊ आहेत. सर्व मुले चुलत भाऊ, भावंडे होती. माहिती मिळताच रामसिंगपूर पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले, ग्रामस्थांच्या मदतीने पाचही मुलांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून रामसिंगपूर हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले. अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी रामसिंगपूर रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली आहे. स्थानिक प्रशासकीय अधिकारीही रुग्णालयात पोहोचले आहेत. ते अपघाताची माहिती गोळा करत आहेत.
रविवार सुट्टीचा दिवस भोवला !
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मुले खेळता खेळता शेतात बांधलेल्या डिग्गीजवळ पोहोचली. तिथे मुलं अंघोळ करू लागली. त्यानंतर एक एक करून पाच मुले पाण्यात बुडाली.मात्र आजूबाजूला कोणीही मदतीला नसल्याने त्यांना वेळीच मदत मिळाली नाही अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे.