बँकेच्या नियमात १ ऑगस्ट पासून होणार हे बदल ! जाणून घ्या

    दिनांक : 27-Jul-2022
Total Views |
 
नवी दिल्ली : जुलै महिना संपण्यास आता (banks rule change) काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. पुढील ऑगस्ट महिन्यात बँकिंग क्षेत्राशी निगडित काही बदल होणार आहेत. बँक ऑफ बडोदाने चेक पेमेंट नियमांमध्ये काही बदल केले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, चेक क्लिअरन्सबाबत हे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, 1 ऑगस्टपासून 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकच्या पेमेंटसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ अनिवार्य करण्यात आले आहे. त्याशिवाय पेमेंट करता येणार नाही.

reserv bank 
 
 
 
बँकिंगमधील फसवणूक टाळण्यासाठी (banks rule change) रिझर्व्ह बँकेने 2020 मध्ये चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू केली. चेकद्वारे 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरताना महत्त्वाची माहिती देणे बंधनकारक आहे. ही माहिती मेसेज, अ‍ॅप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएमद्वारे देता येते. चेकद्वारे पेमेंट करण्यापूर्वी हे तपशील तपासतात. त्यालाच ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ असे म्हटले जाते.
 
गेल्या काही दिवसांत (banks rule change) बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार समोर आले होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. बर्‍याच बँकांनी हा नियम लागू केला असून आता बँक ऑफ बडोदानेही ही सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.