जळगाव तहसील कार्यालयात २ हजारांची लाच घेताना शिपाई जाळ्यात!

27 Jul 2022 16:44:01
जळगाव : संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एका निराधार महिलेकडे दोन हजारांची लाच मागून ती स्वीकारताना येथील तहसील कार्यालयातील शिपाईला आज बुधवारी दुपारी १ वाजता जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. दरम्यान, या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
 

curption
 
 
 
मगन गोबा भोई (जळगाव) असे अटकेतील शिपाईचे नाव आहे. तक्रारदार या घटस्फोटीत असून निराधार असून मुलगी व आई सोबत त्या वास्तव्यास आहेत. जळगाव तहसील कार्यालयाचे रेल्वे स्थानकाजवळील पोलिस कार्यालयाजवळ कार्यालय असून तेथे शिपाई मगन भोई हे संजय गांधी निराधार योजनेचे फार्म जमा करतात. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थींचे फार्म स्वीकारणे व लाभार्थींना शासकीय अनुदान मिळवून देणे हे त्यांचे काम आहे.
 
तक्रारदार त्यांच्याकडे आल्यानंतर आरोपीने बुधवारी त्यांच्याकडे आईचे काम करून देण्यासाठी तीन हजार व तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी दोन हजार मागितले होते. मात्र, आधी तक्रारदारांचे काम करून देण्यासाठी दोन हजार मागितल्याने तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी एक वाजता लाच स्वीकारताच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
 
पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक (रीडर) सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्यासह पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुले, महिला हवालदार शैला धनगर, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, प्रवीण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, पोलिस कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टैबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने यशस्वी केला.
Powered By Sangraha 9.0