वेध
हरयाणाचा २४ वर्षीय क्रीडापटू नीरज चोप्रा Neeraj Chopra म्हणजे भारताला गवसलेला हिरा आहे. गतवर्षी त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला प्रथमच अॅथ्लेटिक्समध्ये पदक जिंकून दिले; तेसुद्धा सुवर्णपदक!
आता गत रविवारी अमेरिकेच्या यूजीन येथे आयोजित विश्व अॅथ्लेटिक्स स्पर्धेत त्याने समस्त देशवासीयांना अभिमान वाटेल अशी ऐतिहासिक रौप्यपदक जिंकण्याची कामगिरी केली. Neeraj Chopra त्याच्या ऑलिम्पिक सुवर्ण व विश्व रौप्यपदकामुळे भारताचा जागतिक स्तरावर लौकिक वाढला आहे. Neeraj Chopra नीरजची कामगिरी केवळ कौतुकास्पदच नाही; इतर युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे.
सैन्यदलातील या सुभेदाराने शिस्त, जिद्द, चिकाटीच्या बळावर तसेच सरकारकडून मिळालेल्या सर्व सोयीसुविधांचा पुरेपूर फायदा घेत संधीचे सोने केले व यापुढेही करीत राहील. नीरजने टोकियोमध्ये ८७.५८ मीटर अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले तर विश्व अॅथ्लेटिक्स स्पर्धेत पीछाडीवर राहिल्यानंतर चौथ्या फेरीत जोरदार मुसंडी मारून नीरजने रौप्यपदक जिंकले. Neeraj Chopra चौथ्या प्रयत्नात त्याने ८८.१३ मीटरची नोंद केली. नीरजसोबत भारताच्या रोहित यादवनेही भालाफेकमध्ये १० वे स्थान, ४ बाय ४०० मीटर रिले संघाने १२ वे स्थान, तिहेरी उडीत एल्डोस पॉलने नववे स्थान तर ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळेने ११ वे स्थान मिळविले. तब्बल १९ वर्षांनंतर नीरजमुळे भारताला विश्व स्पर्धेत पदक मिळाले. Neeraj Chopra २००३ पॅरिस विश्व अॅथ्लेटिक्स स्पर्धेत अंजू बॉबी जॉर्जने लांब उडीमध्ये कांस्यपदक जिंकले होते.
Neeraj Chopra अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी दिवसेंदिवस बहरत चालली आहे. आधी देशात क्रीडा क्षेत्र फार दुर्लक्षित होते. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात खेळासाठी तुटपुंजी आर्थिक तरतूद असायची. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सत्ताकाळात क्रीडा क्षेत्राला चांगले प्रोत्साहन दिले जात आहे. Prime Minister Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने योगा, स्वस्थ भारत, खेलो इंडियासारखे उपक्रम राबविले. आज क्रीडा क्षेत्रातील होणारी प्रगती हे त्याचेच द्योतक आहे, त्याचीच फलश्रुती आहे. खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया महिला क्रीडा स्पर्धा तसेच खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा केवळ नावापुरती राबविली जाणारी शासकीय योजना नाही. Neeraj Chopra या स्पर्धांवर शासनाची बारीक नजर आहे.
या स्पर्धेत उत्तम कामगिरी करणा-या खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाते, त्यांच्या कौशल्यात वाढ होण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात; Neeraj Chopra याशिवाय त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव मिळावा, म्हणून त्यांच्याकरिता विदेश दौ-याचेही आयोजन केले जाते. स्पर्धा व प्रशिक्षणासाठी विदेशात पाठविले जाते. याशिवाय खेळाडूंना शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक पाठबळही दिले जाते. Neeraj Chopra मोदी सरकारच्या काळात क्रीडा क्षेत्रासाठी राबविल्या जाणा-या योजनांचा देशातील काही युवक-युवती चांगला लाभ घेत आहेत व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करून स्वत:सोबत देशाचाही मान वाढवित आहेत.
Neeraj Chopra देशातील युवकांनीही या संधीचा लाभ घेत 'खेलो इंडिया'सारख्या उपक्रमात सहभागी व्हायला हवे. काही स्वार्थी लोकांच्या म्हणण्यावरून दगडफेक करण्यापेक्षा युवकांनी Neeraj Chopra नीरज चोप्राप्रमाणे भालाफेकच नव्हे, तर गोळाफेक, हातोडा फेकमध्ये भाग घ्यावा व स्वकर्तृत्वावर नाव कमवावे. देशाची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न करावा. Neeraj Chopra बस्स, याकरिता युवकांनी सुरुवात करण्याची गरज आहे, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर यश निश्चित तुमच्या पदरी पडेल. याच अनुषंगाने कवी दुष्यंत कुमार म्हणतात...कैसे आकाश में सूराख़ नहीं हो सकता...एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो...!
- मिलिंद महाजन
७२७६३७७३१८