धक्कादायक... पुण्यात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दारु पिण्यासाठी प्रोत्साहन देणारे फ्लेक्स

22 Jul 2022 16:27:05
पुणे : पुण्यातील लोणी काळभोर इथल्या MIT कॉलेज बाहेर विद्यार्थ्याना चक्क दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देणारे फलक (Flakes) लावण्यात आले. हे फ्लेक्स व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे'पुण्यातील लोणी काळभोर इथल्या MIT कॉलेज बाहेर विद्यार्थ्याना चक्क दारू पिण्यासाठी प्रोत्साहन देणारे फलक (Flakes) लावण्यात आले. हे फ्लेक्स व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
 
 

flakes 
 
 
 
लोणी इथल्या MIT कॉलेज बाहेर द टीपसी टेल्स या हॉटेलने हा फलक (Flakes) लावला. यात विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑफर देण्यात आली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयडी कार्ड दाखवा आणि विशेष सवलतीत कितीही ड्रिंक्स घ्या अशी सार्वजनिक जाहीरात देण्यात आली होती. विद्यार्थ्यांना दारू पिण्यासाठी खास सवलत देणाऱ्या या हॉटेलवर पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात आलेली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी देवीप्रसाद शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे पोस्टर (Flakes) वायरल झाल्यानंतर काही वेळात ते काढून टाकण्यात आलं आहे.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0