भीषण दुर्घटना... ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर बांधकाम चालू असलेला पूल कोसळल्याने कामगार दबले ;

    दिनांक : 20-Jul-2022
Total Views |
 
दुर्घटनेत  दोन मजुरांचा मृत्यू तर ६ जखमी
 
 

pool
 
 
रुद्रप्रयाग : ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्गावर bridge will collapse रुद्रप्रयागपासून 6 किमी अंतरावर नारकोटाजवळ बांधण्यात येत असलेल्या बांधकामाधीन पुलाचे शटर उखडले आहे. या अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर सहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सध्या 6 जखमी मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शटरिंगमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमला प्रचंड संघर्ष करावा लागला.रुद्रप्रयागमध्ये 64 कोटी रुपये खर्चून पूल बांधला जात आहे. ऑल वेदर रोड प्रकल्पांतर्गत हा पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम आरसीसी कंपनी करत आहे. सध्या पुलाचे शटरिंगचे काम सुरू आहे. दरम्यान, आजपासून हा अपघात झाला. सध्या आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि प्रशासनाचे बचाव पथक मदतकार्यात गुंतले आहेत.