बस अपघाताची मोदींनी घेतली दखल !

    दिनांक : 18-Jul-2022
Total Views |

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर
 
नवी दिल्ली : PM Modi राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडलेल्या अपघातात Bus Accident १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. जळगावच्या अमळनेरकडे निघालेली बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुःखद असून अशा काळात आपल्या प्रियजनांना गमावणाऱ्या कुटुंबीयांसोबत मी आहे, असा शोकसंदेश मोदी यांनी दिला आहे.
 
bus apghat
 
 
 
PM Modi प्रधानमंत्री मोदी आपल्या शोकसंदेशात म्हणाले, 'मध्य प्रदेशमधील धार येथी अपघाताची Bus Accident घटना अतिशय दुखद आहे. या घटनेत ज्यांनी आपल्या प्रयिजनांना गमावले, मी त्यांच्यासोबत आहे. बचावकार्य सुरु आहे. स्थानिक प्रशासनामार्फत शक्य ती मदत केली जात आहे.'
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी महाराष्ट्र सरकारने सानुग्रह अनुदानाची रक्कम जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्याचवेळी, पंतप्रधान कार्यालयाने PMO अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंदूरहून जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस खरगोनमध्ये नदीत पडली. या अपघातात चालकासह सर्व 13 जणांचा मृत्यू झाला आहे. नदीतून १३ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.