जम्मूत ग्रेनेड स्फोट ; लष्कराचा कॅप्टन आणि जेसीओ ठार

    दिनांक : 18-Jul-2022
Total Views |
जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ Captain and JCO killed जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर चुकून हातबॉम्बचा स्फोट होऊन लष्कराचा एक कॅप्टन आणि एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जेसीओ) ठार झाला.

sainik
 
 
 
अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री ही घटना घडली, जेव्हा लष्कराचे जवान पूंछ जिल्ह्यातील मेंढर भागात तैनात होते. ते म्हणाले की, आर्मी कॅप्टन आणि नायब-सुभेदार (जेसीओ) यांना तातडीने हेलिकॉप्टरने उधमपूरला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 17 जुलै 2022 च्या रात्री पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये एका अपघाती ग्रेनेडचा स्फोट झाला, जेव्हा सैनिक नियंत्रण रेषेजवळ आपले कर्तव्य बजावत होते. या स्फोटात सैनिक जखमी झाले असून त्यांना तातडीने उधमपूरला हलवण्यात आले आहे.