छत्रपती संभाजीनगर : जळगाव येथील  विवेक काटदरे यांची विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानच्या प्रांताध्यक्षपदी २०२२ ते २५ या कालावधीसाठी निवड झाली आहे.  छत्रपती संभाजीनगर येथे आज १७ रोजी झालेल्या विद्याभारतीचा प्रांत वार्षिक सर्वसाधारण सभेत या जबाबदारीची घोषणा करण्यात आली आहे.
 
यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय अध्यक्ष आण्णासाहेब शेषाद्री डांगे व राष्ट्रीय उपाध्यक्षा मधुश्रीताई सावजी उपस्थित होत्या.