दुर्दैवी घटना... जळगावच्या सम्राट कॉलनीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

17 Jul 2022 17:23:41
जळगाव: जळगाव शहरातील सम्राट कॉलनीत राहणाऱ्या 35 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीला आली आहे. . या घटने मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. . अरविंद देविदास इंगळे (वय 35, रा. सम्राट कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे 
 

galafas 
.
 
 
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अरविंद इंगळे हा तरूण आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह सम्राट कॉलनीत वास्तव्यास होता . व वेल्डिंगचे काम करून उदरनिर्वाह करत होता.
 
शनिवारी 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता घरात सर्वजण एकत्र जेवन करून झोपले होते. रात्रीतून त्याने घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्याला मृत घोषीत केले.
 
घटनेचे कारण अस्पष्ट
 
दरम्यान, अरविंदने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रविवारी सकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यांनी रुग्णालयात आक्रोश केला. मृत अरविंदच्या पश्चात वडील देवीदास इंगळे, आई रंजना, मोठा भाऊ सुधिर आणि विवाहित बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0