बंगालमधील मालदामध्ये बॉम्बचा स्फोट

    दिनांक : 17-Jul-2022
Total Views |
 पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात रविवारी पहाटे देशी बनावटीच्या बॉम्बचा स्फोट होऊन दोन जण ठार झाले, तर एक जण जखमी झाला. पोलिसांनी ही माहिती दिली. फरझान एसके (४५) आणि सफीकुल इस्लाम (३०) अशी मृतांची नावे आहेत, असे त्यांनी सांगितले. माणिकचक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेसरठाळा बलुटोला येथील शेतात हे सर्वजण बॉम्ब बनवत असताना चुकून बॉम्बचा स्फोट झाला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिक लोकांनी मोठा आवाज ऐकला. आमचे जवान पोहोचेपर्यंत तीन जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यापैकी दोघांना रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर दुसऱ्यावर मालदा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 

bomb blast
 
 
 
त्यांनी सांगितले की घटनास्थळावरून काही कच्चा माल सापडला आहे, ज्याचा वापर देशी बॉम्ब बनवण्यासाठी केला जात होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके Bomb blast कुठून आणली याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बॉम्ब बनवण्यामागचा उद्देशही शोधला जात असल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्बशोधक पथक परिसरात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधीक्षक प्रदीपकुमार यादव यांनी सांगितले. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, त्यांचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी या परिसरातून चार शस्त्रे जप्त करण्यात आली. स्थानिकांनी सांगितले की, जमिनीवरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधील गटबाजीमुळे गेल्या काही आठवड्यांपासून या भागात तणाव निर्माण झाला आहे.