इम्रान खानच्या अडचणीत वाढ , पाकिस्तान सरकारकडून होणार देशद्रोहाची कारवाई !

16 Jul 2022 18:31:02
इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारकडून माजी पंतप्रधान Imran Khan इम्रान खान यांच्या विरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची तयारी केली जात असून, यामुळे खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशद्रोहाच्या कारवाईसाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती Imran Khan इम्रान देशद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आहे की नाही, यासंदर्भात निर्णय घेईल, अशी माहिती मंत्री मरियम औरंगजेब यांनी माध्यमांना दिली.
 
 

imran1 
 
 
 
पाकिस्तानी संविधानानुसार, कलम 6 अंतर्गत जर कोणत्याही व्यक्तीने राज्यघटना किंवा संविधान मोडले, बळजबरीने किंवा इतर कोणत्याही मार्गाने राज्यघटना मोडण्याचे षडयंत्र केले तर, अशी व्यक्ती देशद्रोही ठरते आणि तिला फाशीची शिक्षा होते. ही समिती कायदा मंत्री आझम नजीर तरार यांच्या नेतृत्वाखाली काम करेल आणि पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आपल्या सूचना मांडेल. मागील सरकारने असंवैधानिक आदेश दिले होते, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने सिद्ध झाले आहे, असे मरियम औरंगजेब यांनी सांगितले. Imran Khan इम्रान खान यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाचा वादग्रस्त निर्णय न्यायालयाने का फेटाळला, यावर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करणारा सविस्तर निकाल दिल्यानंतर सरकारने ही पावले उचलली आहेत.
Powered By Sangraha 9.0