बिहार सरकारचा नवीन नियम ! ; दुसऱ्या लग्नसाठी लागेल सरकारची परवानगी अन्यथा...

    दिनांक : 16-Jul-2022
Total Views |
पटना : बिहारमध्ये दुसरे लग्न करण्यासाठी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. नवीन नियमांनुसार, बिहार सरकारमध्ये नियुक्त केलेल्या कोणत्याही स्तरावरील कर्मचार्‍यांसाठी दुसरा विवाह तेव्हाच वैध मानला जाईल जेव्हा त्यांनी त्यासाठी सरकारची परवानगी Governmen Permission घेतली असेल.
 
 


marrage1
 
 
 
 
जर दुसऱ्या Governmen Permission लग्नाला पर्सनल लॉ ने मान्यता दिली असेल आणि सरकारची परवानगी घेतली नसेल, तर हा विवाह वैध ठरणार नाही. नितीश सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार माजी पती किंवा पत्नी हयात प्रकारचा हक्क मिळणार नाही. सेवेच्या कालावधीत कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास अशा मुलाची अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करण्याचा प्रस्ताव योग्य मानला जाणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सरकारची परवानगी घेऊन दुसरा विवाह कायदेशीर पद्धतीने केला असेल, तर अशा परिस्थितीत Governmen Permission पत्नी आणि मुले अनुकंपा नोकरीसाठी पात्र मानली जातील.
 
सरकारने Governmen Permission जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार यामध्येही पहिल्या पत्नीच्या स्थानाचा विचार केला जाईल. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सर्व विभागांचे प्रमुख, डीजीपी, विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहेत. शासन स्तरावरून ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. पहिल्या पत्नीव्यतिरिक्त, दुसऱ्या पत्नीच्या नियुक्तीचा विचार करण्याची गरज असल्यास, Governmen Permission हयात असलेल्या पत्नीच्या वतीने कोणताही आक्षेप किंवा प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार नाही. नितीश सरकारच्या या निर्णयामुळे कौटुंबिक पातळीवरील अनेक अडचणी दूर होतील, असे बोलले जात आहे.