लघुउद्याेग भारतीचा उपक्रम ; कारखान्यांच्या गर्दीमध्ये उभारले घनदाट जंगल

15 Jul 2022 15:33:16
दीड एकरात जगवली सहा हजार वृक्ष
 
जळगाव: शहराजवळील एमआयडीसीत एका खुल्या भूखंडावर लघुउद्याेग भारती या उद्याेजकांच्या संघटनेने तीन वर्षांत घनदाट जंगल उभे केले. ‘मियावाकी’ या जपानी लागवड पद्धतीने देशी वृक्षांची लागवड केल्याने दीड एकरावर सहा हजार वृक्षांचे जंगल निर्माण तसेच येथे जैवविविधता फुलली आहे. जिल्हाधिकारी, जि.प.चे सीईआे, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी जंगलाला भेट दिली. एमआयडीसीचा पडून असलेला दीड एकराच्या उजाड भूखंडात हिरव्यागार जंगलाची भुरळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही आवडली आहे.
 
 


LUB 
 
 ‘मियावाकी’ पद्धतीमुळे झाले घनदाट जंगल
 
तीन वर्षांपूर्वी ‘मियावाकी’ या सघन लागवड पद्धतीने एक मीटर अंतरात दाेन झाडांची लागवड करण्यात आली आहे. सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झाडे एकमेकांच्या स्पर्धेत उंच वाढल्याने या झाडांची उंची ८ ते १० फूट आहे. त्यामुळे घनदाट जंगल तयार झाले आहे. या जंगलामुळे येथे विविध पक्षी, कीटकांची जैवविविधता आढळून येते. लघुउद्याेग भारतीचे अध्यक्ष तथा वन्यजीव संरक्षक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
 
जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जि.प.चे सीईआे डाॅ. पंकज आशिया, गटविकास अधिकारी यांनी उद्याेग भारतीच्या जंगला भेट दिली. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबवण‌ार असल्याचे जिल्हाधिकारी, सीईआेंनी जाहीर केले.
Powered By Sangraha 9.0