मोबाईलवर रिचार्ज करून न दिल्‍याने तरुणाने उचलले टोकाचे पाऊल ; पब्‍जी गेमसाठी आत्‍महत्‍या

13 Jul 2022 18:20:05
बोदवड : शहरातील दत्त कॉलनीमधील रहिवासी सुरेश सखाराम माळी (वय ५१) यांचा मुलगा अजय सुरेश माळी (वय २०, रा. दत्त कॉलनी बोदवड) असं मृत तरुणाचं नाव आहे. याला मोबाईलवर पब्जी (PUBG) खेळण्याची आवड होती. यासाठी सुरेश माळी यांनी त्याला नुकताच स्मार्टफोन घेऊन दिला होता. मात्र त्यातील डाटा लागलीच संपल्याने त्याने वडिलांकडे रिचार्जसाठी आग्रह केला. यावेळी वडिलांनी त्याला थांबण्याचे सांगितले असता अजय हा घरातून निघून गेला होता. यानंतर अजयच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो आढळला नाही. त्यामुळे या संदर्भात बोदवड (Police) पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती.
 
 

pubji
 
 
अन्‌ विहिरीत आढळला मृतदेह
 
दरम्यान १२ जुलै रोजी शहरातील रूपनगरामधील प्रभाग क्रमांक तीनमध्ये खाटीक समाज मंदिराजवळील विहिरीत अजय याचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी सुरेश माळी यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0