श्रीलंकेत आणीबाणीजाहीर नागरिकांचे तीव्र निदर्शने, परिस्थिती अनियंत्रित

13 Jul 2022 13:49:01

श्रीलंका: श्रीलंकेत आर्थिक आणि राजकीय संकट अधिक गडद झाले आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्याचे वृत्त आहे. त्यांनी गेल्या आठवड्यात १३ जुलै रोजी पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, ते देश सोडून पसार झाल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान निवासस्थान घेरले आहे. परिस्थिती चिघळल्याने देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. (Sri Lanka Emergency)
 
 

shrilanka1
 
 
राष्ट्रपती गोटबाया यांनी देश सोडल्याचे वृत्त समजल्यानंतर येथील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. प्रचंड मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला आहे. निदर्शकांनी संसदेकडे कूच केली. सुरक्षा दलाचे जवानही मोठ्या संख्येने तैनात आहेत.
 
कोलंबोमध्ये (Colombo) श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलक घुसले. निदर्शकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. काही आंदोलकांवर लाठीमार केल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेत आणीबाणी (Sri Lanka declares state of emergency) घोषित केली आहे.
 
गोंधळ घालणाऱ्या निदर्शकांना अटक करण्यात यावी, तसेच त्यांची वाहने जप्त करण्यात यावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे आंदोलक (Protest) प्रचंड आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान विक्रमसिंघे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
Powered By Sangraha 9.0