जळगाव रस्ते विकासासाठी 5 कोटी निधी मंजूर

13 Jul 2022 19:58:34
जळगाव : नगरविकास विभागांतर्गत जळगाव शहरातील रस्ते विकासासाठी 5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून जळगाव शहराचे आ. सुरेश भोळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.


Jalgaon_Road1 
 
राज्यात भाजपा व शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले असून जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांची विकासात्मक कामे होण्यासाठी शहराचे आ. सुरेश भोळे यांनी नगरविकास विभागातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 5 जुलै 2022 रोजी पत्राद्वारे केली होती.
 
या मागणीवर मुख्यमंत्री ना.शिंदे यांनी तात्काळ निर्णय घेत 7 जुलै रोजी जळगाव शहरातील रस्ते विकास कामांसाठी 5 कोटी रुपये मंजूर केले असून आ. राजुमामा यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.
 
जळगाव शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मुख्यमंत्री ना. शिंदे आणि नगरविकास विभाग यांच्या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
 
रस्ते विकास कामांसाठी विकास निधी मंजूरीमुळे आ.सुरेश दामु भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री तथा आ.गिरीश महाजन यांचे आभार व्यक्त केले आहे.
Powered By Sangraha 9.0