तभा इफेक्ट : सावखेडा परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांचे छापे

12 Jul 2022 19:10:20
जळगाव : अमळनेर तालुक्यातील "सावखेडयात गावठी दारूसह अवैध धंद्यांना ऊत, बंदीसाठी ग्रामस्थांचे थेट मुख्यमंत्र्यांना ट्विट" अशी बातमी तरुण भारत पोर्टलने १० रोजी प्रसिद्ध केली होती. परिणामी सावखेडा गावात दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी कारवाई करत ३ अवैध दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले तर एक जण पळ काढण्यात यशस्वी झाला.
 

Savkheda
 
सावखेडा ता. अमळनेर गावातील संपूर्ण हातभट्टीची दारू व मटका बंदी करण्यात यावी असा ठराव ग्रामपंचायतीत करण्यात आला होता. तरी देखील प्रशासन लक्ष देत नसल्याने लक्ष्मीकांत कदम या ग्रामस्थाने थेट तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट केले होते. यावर अमळनेर पोलिसांनी कारवाई करत या गावी छापे टाकून बाबू मारुती वैदू, रतन मल्लू वैदू, परशुराम भीका वैदू यांना ताब्यात घेतले असून यांच्या कडून 6 हजार रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या दरम्यान सोमा बापू वैदू हा याठिकाणाहून पळ काढण्यास यशस्वी झाला. या आरोपींवर महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली. याकामी पो.उ.नि नरसिंह वाघ,पो.कॉ सुनील पाटील, राहुल पाटील, कपिल पाटील, योगेश बागुल, योगेश पाटील यांनी दारू बनविण्याचे सर्व साहित्य छापे मारून उध्वस्त केले.
Powered By Sangraha 9.0