वडफळी आश्रम शाळेच्या परिसरात देव नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने शाळा परिसर संपूर्ण जलमय !

10 Jul 2022 15:16:50
आश्रम शाळेच्या दोनशे विद्यार्थ्यांना हलविले प्राथमिक आरोग्य केंद्रात
 
नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वडफळी या ठिकाणी शासकीय आश्रम शाळा आहे. या शासकीय आश्रम शाळेच्या परिसरात देव नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने शाळा परिसरात संपूर्ण जलमय परिस्थिती झाली आहे. मुलांच्या राहत्या (Nandurbar News) खोलींमध्ये पाण्याचा प्रवाह आल्याने शाळा प्रशासनाच्या वतीने मुलांना दोरीच्या साह्याने बाहेर काढत दोनशे मुलांना प्राथमिक आरोग्‍य केंद्रात सुरक्षितस्थळी हलविले आहे.
 

pavus
 
 
तळोदा (Taloda) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मैयंक घोष यांच्या माहितीनुसार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना (Student) जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. जवळपास 200 विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. आश्रम शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना पुराचा कोणताही धोका नाही. सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. विद्यार्थ्यांसाठी जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती प्रकल्प अधिकारी मैयंक घोष यांनी दिली आहे. आश्रम शाळेत मुख्याध्यापकांसह कर्मचारी व महसूल कर्मचारी, तलाठी घटनास्थळी दाखल झाले असून प्रकल्प अधिकारी देखील शासकीय आश्रम शाळा वडफळीकडे रवाना झाले.
 
 
Powered By Sangraha 9.0