किंगमेकर...!

    दिनांक : 01-Jul-2022
Total Views |
अग्रलेख
 
KingMaker देवेंद्र फडणवीस यांचे आज जेवढे वय आहे, तेवढी वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सक्रिय राजकारणात आहेत; सातत्याने कुठल्या ना कुठल्या पदावर आहेत, असे म्हणत फडणवीसांना कमी लेखणा-यांना 'कालच्या पोराने' जोरदार चपराक हाणली आहे.
 
 
 
kingmaker
 
 
 
 
 
' पुन्हा येईल' असे म्हणणा-या देवेंद्र फडणवीसांची सतत टिंगल करणा-या लोकांनाही फडणवीस यांनी प्रत्यक्ष कृतीने धमाकेदार उत्तर दिले आहे. KingMaker शिवसेनेत बंड करणा-या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊ करून देवेंद्र फडणवीस यांनी 'मास्टर स्ट्रोक' लगावला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा विचार पुढे नेऊ इच्छिणा-या एका सामान्य शिवसैनिकाला राज्याचा मुख्यमंत्री करण्याची जबाबदारी खरे तर पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांची होती. KingMaker परंतु, विश्वप्रवक्ते, पावसात भिजलेले काका आणि आसपासच्या बडव्यांनी केलेली दिशाभूल यामुळे पक्षप्रमुखांना तसे करता आले नाही.
 
KingMaker शिवसैनिकाला पालखीत बसवायचे आहे आणि बाळासाहेबांना तसे वचन दिले आहे, असे सांगत भाजपापासून फारकत घेणा-या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा आणि मुलालाही मंत्रिमंडळात सामील करवून घेण्याचा मोह आवरता आला नव्हता. पण, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा मोह आवरत बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून ख-या अर्थाने हिंदुत्वाची पताका फडकविण्याचे शिवधनुष्य उचलले आहे, यात शंका नाही. KingMaker केवळ बाळासाहेबांच्या घरात जन्म घेतला म्हणून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेता येत नसतो, तर प्रत्यक्ष कृतीनेच तो पुढे नेता येतो आणि जतनही करता येतो, हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षातच आले नाही किंवा मग लक्षात येऊनही त्यांनी तसे केले नाही. KingMaker देवेंद्र फडणवीस यांना नवमहाराष्ट्र घडवायचा होता, त्यांना गावे जलयुक्त करायची होती, त्यांना शहरे विकसित करायची होती, त्यांना शेतक-यांचे कल्याण करायचे होते, त्यांना युवापिढी सक्षम करायची होती आणि म्हणून 'मी पुन्हा येईल' असे ते म्हणाले होते, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
KingMaker त्यांना सत्तेत येण्याचा मोह कधीच नव्हता. असता तर ते आज 'किंगमेकर'च्या भूमिकेत समोर आलेच नसते. चालून आलेले मुख्यमंत्रिपद ठोकरत त्यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचा संकल्प करणा-या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदासाठी पाठींबा देत जो त्याग केला आहे, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्यांच्या या कृतीने त्यांची राजकीय उंची निश्चितपणे वाढली आहे. स्वत:ला राजकारणातील 'जाणता राजा' म्हणविणा-यांना देवेंद्र फडणवीस यांच्या या राजकीय खेळीने मोठा धक्का बसला असणार, हेही निश्चित! KingMaker सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर रात्री उशिरा फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेसमोर राजीनाम्याची घोषणा करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनीही 'मी पुन्हा येईल'ची टिंगल केलीच होती. मी पुन्हा येईल असे कधी म्हणालोच नव्हतो असे सांगताना उद्धव ठाकरे हे कुत्सितपणे हसल्याचे राज्यातील जनतेने पाहिले आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या देवेंद्र फडणवीस यांच्या खेळीने आता ठाकरे आणि त्यांचे सहकारी घायाळ झाले असणार, यातही शंका नाही. KingMaker
तत्त्वांशी तडजोड न करता देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असल्याने बंडखोरांना धुणीभांडी करावी लागतील, ही विश्वप्रवक्ते आणि सेनेतील इतरांची भाषाही बंद पाडली आणि त्यांचे दात त्यांच्याच घशात कसे घातले, हे त्यांनाही समजले नाही. KingMaker शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सत्तेपासून कायम दूर राहिले. त्यांनी मनोहर जोशी, नारायण राणे यांना मुख्यमंत्रिपदी बसविले होते. बाळासाहेबांनी कायम आक्रमक हिंदुत्वाचीच भूमिका घेतली. पण, स्वत:ला त्यांचे वारसदार म्हणविणा-या उद्धव ठाकरे यांना ते अजिबात जमले नाही. KingMaker ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जमिनीत गाडण्याची भाषा बाळासाहेबांनी आयुष्यभर केली, त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अनैसर्गिक आघाडी करीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने हिंदुत्वाला मूठमाती दिल्याची भावना हिंदुत्व समर्थकांमध्ये तसेच आज ज्या ३९ शिवसेना आमदारांनी बंड केले त्यांच्या मनात निर्माण झाली होती.KingMaker
 
विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळे उणेपण वेळोवेळी लक्षातही आणून दिले. KingMaker परंतु, काकांच्या भूलथापांना आणि विश्वप्रवक्त्याच्या चिथावणीला बळी पडलेल्या पक्षप्रमुखांनी याबाबत कधी गांभीर्याने विचार केलाच नाही. त्याचीच किंमत त्यांना आज मोजावी लागली आहे. KingMaker 'मी पुन्हा येईल'ची जी चेष्टा करण्यात आली, ती चेष्टा करणा-यांच्या घशात घालण्यात फडणवीस यशस्वी ठरलेत. छत्री असूनही पावसात भिजायचे, गणपतीच्या दर्शनाला जायचे आहे हे ठरवूनही मांसाहार करायचा आणि मग बाहेरूनच दर्शन घेण्याचा जो नाटकीपणा काकांनी केला, तो उभ्या महाराष्ट्राने अनुभवला आहे. KingMaker काहीही असो, देवेंद्र फडणवीस यांनी जी कृती केली आहे, ती वाखाणण्याजोगी आहेच; आत्यंतिक कौतुकास्पदही आहे.
 
KingMaker संख्याबळ असतानाही देवेंद्र फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. फडणवीसांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असं जे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत, तेही योग्यच! एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, त्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला, त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं, हे संपूर्ण महाराष्ट्राने ऐकलं आहे. KingMaker देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह राजभवनात जात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी घोषणा केली तेव्हा अख्खा महाराष्ट्र आश्चर्यचकित झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या बाबीचाही समावेश होता, हे शेवटपर्यंत कुणाच्याही लक्षात आले नाही आणि ही बाब गोपनीय ठेवण्यात जे यश फडणवीस यांना आलं, त्यावरून ते किती क्षमतावान, प्रगल्भ आणि धूर्त राजकीय नेते आहेत, हे स्पष्ट झाले आहे.KingMaker
 
भाजपने आम्हाला साथ दिली, संख्याबळानुसार त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा न लावता बाळासाहेबांच्या विचाराने चालणाèया व्यक्तीला मुख्यमंत्रिपद दिलं. KingMaker हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा आहे. देवेंद्र फडणवीस आमच्या पाठीशी आहेत. ते राज्याच्या विकासासाठी आमच्यासोबत आहेत. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी जी भावना नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे, ती लक्षात घेतली तर महाराष्ट्र प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहील, यात शंका नाही. KingMaker राज्याचा विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास हा अजेंडा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक वैचारिक भूमिका घेऊन राज्यातील जनतेपुढे येतील, यातही शंका राहिलेली नाही. KingMaker गतकाळात शिंदे आणि समर्थकांनी उद्धव ठाकरेंना सेना आमदारांच्या मतदारसंघातील अडचणींची माहिती दिली; त्यामध्ये सुधारणा व्हावी अशी मागणी केली होती, राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी कानावर घातल्या होत्या, पण महाविकास आघाडीमध्ये त्यावर निर्णय घेतले जात नव्हते. KingMaker त्यामुळेच शिवसेनेत मोठे ऐतिहासिक बंड घडून आले. पक्षाचे ५० आमदार ज्यावेळी वेगळी भूमिका घेतात तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज होती.KingMaker
 
KingMaker पण, कोण काय बिघडवणार या आविर्भावात वावरणा-या सेना नेतृत्वाने अहंकारापोटी पक्षातील असंतोषाकडे दुर्लक्ष केले आणि त्याचे व्हायचे तेच परिणाम आता समोर आले आहेत. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका घेऊन ५० आमदारांनी वेगळी भूमिका घेतली, त्यांना खरे तर धन्यवादच द्यायला हवेत. त्यांनी शिंदेंवर जो विश्वास दाखवला त्याला तडा जाऊ देऊ नये, ही शिंदे यांची जबाबदारी ठरते. KingMaker सरकार लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यास कटिबद्ध कसे राहील, याकडे नव्या मुख्यमंत्र्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती; ती भाजप आणि शिंदे यांनी पूर्ण केली आहे. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा करताना आपण मंत्रिमंडळाबाहेर राहू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. KingMaker पण, केंद्रीय नेतृत्वाने त्यांना मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होण्याचा आग्रह केला, त्यांची मनधरणी केली आणि त्यामुळे फडणवीसांचा नाईलाज झाला. असो, राज्याच्या हितासाठी फडणवीस यांनी मनाचा जो मोठेपणा दाखवला आहे, तो प्रशंसनीय आहे.KingMaker