काय? अवघ्या पाच दिवसात 75 किमीचा रस्ता, अमरावती-अकोला हायवेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद

    दिनांक : 08-Jun-2022
Total Views |
दिल्ली: राज्यभरातील अनेक खराब रस्त्यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा (Traffic Jam) सामना करावा लागत असून निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी विलंब होतो. शिवाय, याच कारणामुळे रस्ते अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे राज्यातील अनेक रस्त्यांच्या दुरूस्तीचे (Road Repairing) काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अशातच माहाराष्ट्रातील (Maharashtra) अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील (amravati akola road) ७५ किलोमीटरच्या रस्ताची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ (guinness book of world records) मध्ये याची नोंद झाली आहे. या कारण म्हणजे महामार्गावरील ७५ किलोमीटरचा रस्ता अवघ्या पाच दिवसात पूर्ण झाला आहे. जलद आणि कमी वेळेत रस्त्याचे बांधकाम झाल्याने नवा विक्रम झाला आहे.
 
 
 
highway
 
 
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रस्ता निर्मितीचा एक ऐतिहासिक, जागतिक विक्रम झाला आहे. काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे विक्रमी बांधकाम 3 जूनपासून सुरू झाले असून 7 जून रोजी हा 75 किमीचा रस्ता बांधून पूर्ण झाला.
 
5 दिवसात 75 किमीचा रस्ता तयार करण्यासोबतच या कामाची नोंद गिनीज बुकमध्ये देखील झाली. राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून महामार्गावरील लोणी ते बोरगावमंजू या 75 किमी रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रीट पद्धतीने झाले.
 
राजपथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनिज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार पार पडला. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला गेला.
यावेळी गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे की, हा एक ऐतिहासिक क्षण आहे. मला या टीमचं अभिनंदन करताना खूप आनंद होत आहे. राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड आणि जगदीश कदम यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन.
 
75 किमी अखंड बिटुमिनस काँक्रीट रस्ता टाकण्याचे काम तुम्ही पूर्ण केलं. तुमच्या चिकाटी आणि कामाच्या बळावर नवे व्हिजन तयार होत आहे.
 
सर्व इंजिनिअर आणि कामगारांचे आभार. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे, अशा शब्दात गडकरींनी कौतुक केलं आहे.
अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर अमरावतीच्या लोणी ते अकोल्याच्या मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान करण्याचे नियोजन कंपनीने केले.
 
गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र
 
राजपथ इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. महामार्गावरील लोणी ते बोरगावमंजू या ७५ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम बिटूमिनस काँक्रीट पद्धतीने करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत काम केल्याने गिनीज बुक रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (nitin gadkari) हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित असून, रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

cirtificate
 
 
रस्त्याचे बांधकाम ३ जूनपासून
 
काँक्रिटीकरणासह, जगातील सर्वात लांब आणि अखंड अमरावती ते अकोला रस्ता निर्मितीची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद झाली आहे. अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे बांधकाम ३ जूनपासून सुरू झाले होते. त्यानंतर या कामला उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रचंड गती देत ७ जून रोजी या महामार्गावरील ७५ किमीचा रस्ता बांधून पूर्ण केला. मात्र, कमी वळेत इतका मोठा रस्ता तयार करण्यात आल्याने या रस्त्याची दखल थेट गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे.