Indian Railways : आयआरसीटीसीकडून रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज

07 Jun 2022 13:32:16
मुंबई : राज्यांतर्गत आणि परराज्यातील प्रवासासासाठी कायम रेल्वेला पसंती दिली जाते. खिशाला परवडेल असे तिकीट दर, वेळेत पोहचण्याची हमी आणि सुरक्षितता या त्रिसुत्रीमुळे अनेक जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. आता आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना तिकीट बुकिंग नियमांमध्ये बदल करत मोठी गूड न्यूज दिली आहे.
 

IRCTC 
 
आयआरसीटीच्या माध्यमातून तिकीट बूक करणाऱ्यांना मोठी सुविधा मिळणार आहे. या नियमानुसार, आता प्रवाशांना एक महिन्यात आधीपेक्षा जास्त तिकीट आरक्षित करता येणार आहे. आयआरसीटीसीच्या नियमांनुसार, एका महिन्यात तुम्हाला अधिक तिकीटं काढता येतील.
आयआयरसीटीसीच्या नियमांनुसार आधी 6 तिकीटं आरक्षित करता यायची. तसेच आधार-आयआरसीटीसीसह लिंक असल्यास 12 तिकीटं काढण्याची मुभा असायची. मात्र आता तिकीटांची मर्यादा वाढवून 12 इतकी करण्यात आली आहेत.
असे करा आधार लिंक
  • आयआयसीटीसीच्या अधिकृत ई-तिकीट संकेतस्थळ irctc.co.in येथे भेट द्या.
  • लॉग इन करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्ड टाका.
  • होम पेजवरील माय अकाउंट सेक्शनमधील ‘आधार केवायसी’वर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.
  • आधार कार्डसोबत जो नोंदणीकृत क्रमांक आहे त्यावर ओटीपी येईल.
  • ओटीपी एंटर केल्यानंतर आधारशी संबंधित तपशील पाहिल्यानंतर, व्हेरीफायवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या मोबाइलवर केवायसी तपशील यशस्वीरीत्या अपडेट केल्याचा संदेश येईल.
Powered By Sangraha 9.0