उत्तरकाशी येथे बस दरीत कोसळून 22 भाविकांचा जागीच मृत्यू

    दिनांक : 05-Jun-2022
Total Views |
उत्तराखंड : उत्तरकाशी येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळी एक बस एनएच-९४ वर डामटापासून दोन किमी पुढे जानकीचट्टीजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 22 जणांचा जागीच मृत्यू झालेला असून सर्व प्रवाशी हे मध्य प्रदेशचे यात्रेकरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
bus
 
 
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील २८ यात्रेकरूंना घेऊन निघालेली बस उत्तरकाशी जिल्ह्यातील डामटाजवळ दरीत कोसळली असून 6 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर 6 जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तसेच घटनास्थळी पोलिस आणि SDRF पोहचले असल्याची माहिती DGP अशोक कुमार यांनी दिली आहे.