'राज ठाकरे यांचे ट्विट; त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो !

30 Jun 2022 15:17:01
मुंबई : सत्ता संघर्षाच्या नाट्यमय घडामोडींपासून दोन हात लांब असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एक ट्विट केले असून कुणाचेही नाव न घेता ट्विट केले आहे. हे ट्विट म्हणजे, उद्धव ठाकरे यांना उपरोधक टोला समजला जात आहे. पायाच्या शस्त्रकियेमुळे राज ठाकरे हॉस्पिटलमध्ये भरती होते. तसेच उद्या विधानमंडळात एकनाथ शिंदे गट मनसेत विलीन होणार किंवा इतर कोणता पर्याय निवडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
 
 
raj thakre2 
 
 
विधान परिषद निवडणूक, शिंदे गटाची बंडखोरी, सर्वोच्च न्यायालय कामकाज, बहुमत चाचणी घोषणा, मुख्यमंत्री राजीनामा या सर्व घडामोडीत मनसे प्रमुख राज ठाकरे हे शस्त्रक्रियेमुळे काहीसे लांब होते. विधान परिषद निवडणूक आटोपताच दुसऱ्या दिवशी राज ठाकरे हे शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले. स्वतःच वेगळा गट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ गाठल्यावर शिंदे गट सक्रिय होताच राज ठाकरे यांनी ट्विट करीत ‘ऑपरेशन सक्सेस’ असे म्हटले होते.
 
उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे गट सक्रिय झाला असून दोघांनी सत्ता स्थापनेची तयारी सुरु केली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दुपारी एक ट्विट करीत कुणाचेही नाव न घेता टोमणा लगावला आहे. ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी, एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो, असा उल्लेख केलेला आहे.
Powered By Sangraha 9.0