संताप! तीव्र संताप!!

    दिनांक : 30-Jun-2022
Total Views |
अग्रलेख
 
Udaypur Killing : उदयपूरची घटना तीव्र संताप आणणारीच आहे. तेथे जे घडले त्याने संपूर्ण मानवतेला कलंक लावला आहे. सभ्यतेचा शिरच्छेद केला आहे. शिवाय निर्लज्जपणे या देशाने प्रचंड बहुमताने निवडून दिलेल्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा बेमुर्वतखोर उर्मटपणा दाखविला आहे.
 

telor1
 
 
 
 
या पापाला क्षमा नाही! Udaypur Killing पोलिसांनी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आता यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हायला हवी. तसे झाले तरच पंथवेडेपणाच्या झिंगेत काळ सोकावणार नाही. कायदा, घटना, न्यायव्यवस्था या सगळ्या गोष्टी पंथवेडेपणापुढे गुडघे टेकवून पांगळ्या झालेल्या जर दिसू लागल्या, तर सभ्यतेची महान परंपरा सांगणा-या या देशात श्वास घेणे अवघड होऊन बसेल. आता सहनशीलतेची हद्द झाली. यावर उपाय झालाच पाहिजे
 
Udaypur Killing उदयपूरचा कन्हय्या हा टेलर आपला व्यवसाय करत गुजराण करीत होता. त्याच्या आठ वर्षाच्या मुलाने समाजमाध्यमात नूपुर शर्मा हिचे समर्थन करणारी एक पोस्ट परिणामाची कल्पना नसताना अजाणतेपणी टाकली. पोलिसांनी त्यावर गुन्हा दाखल करून कन्हय्याला अटक केली. त्याची सुटका होताच लगेच कन्हय्याला अतिरेकी पंथवेड्या लोकांकडून धमक्या येणे सुरू झाले. त्याने पोलिसांत तक्रार केली. संरक्षण मागितले. मात्र, पोलिसांनी त्याकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने लक्ष दिले नाही. कन्हय्याला अटक करून त्याच्याकडे पंथवेड्यांचे लक्ष वेधण्याचे काम जणू पोलिसांनी केले. मात्र, कन्हय्याला धमक्या येऊ लागल्या तेव्हा त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. परिणाम व्हायचा तोच झाला. Udaypur Killing धमक्या देणा-यांचे धैर्य वाढले. हे धमक्या देणारे उपटसुंभ धारदार शस्त्र घेऊन कन्हय्याच्या दुकानात आले. दिवसाढवळ्या. ग्राहक असल्याचे नाटक करीत काही संभाषण सुरू केले. अचानक कन्हय्यावर हल्ला करून तिथल्या तिथे गळा चिरून त्याचा खून केला. या सगळ्या खुनी हल्ल्याचा व्हिडीओ तयार करून या नराधमांनी तो अपलोड केला. या व्हिडीओमध्ये हा खून करणारा राक्षसी खुनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देतो की, हेच हत्यार मी तुमच्यासाठी वापरेन! Udaypur Killing