हम रहे या ना रहे कल...!'

03 Jun 2022 10:25:27

वेध 


'हम रहे या ना रहे

कल, कल याद आयेंगे ये पल...

पल ये है प्यार के पल

चल आ मेरे संग चल...

चल सोचे क्या, छोटी सी है जिंदगी...'

 
 
 
k.k.

 

 
 
 
या जगाचा निरोप घेण्याच्या अवघ्या काही तासांआधी संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान, प्रख्यात पार्श्वगायक Krishnakumar Kunnath कृष्णकुमार कुन्नाथ उपाख्य केके यांनी हेच गीत गायिले होते. आपली लहानशी पण अवघ्या तरुणाईला गारुड घालणारी 'जिंदगी' Krishnakumar Kunnath केके सोडून गेला. त्यांचे असे अचानक जाणे मनाला वेदना देणारे आहे. मंगळवारी रात्री कोलकाता येथे एका भरगच्च 'लाईव्ह' कार्यक्रमानंतर हॉटेलच्या पायर्‍यावर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. आधी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती; पण उत्तरीय तपासणी अहवालातून हा मृत्यू अनैसर्गिक नसल्याचे स्पष्ट झाले.
 

आपल्या प्रकृतीबद्दल सजग असलेले Krishnakumar Kunnath केके पहाटे उठून गरम पाणी प्यायचे. व्यायाम करायचे. तरीही अवघ्या 53 व्या वर्षी असे अचानक हृदयविकाराने उचंबळून यावे, हे जास्त दु:खदायक आणि चिंतनीयसुद्धा आहे. आजकाल असे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. आपल्या आजूबाजूला असे प्रकार घडतात तेव्हा आपण अचंबित होतो. मागचे दोन दिवस अवघे संगीत क्षेत्रच अचंबित आहे. Krishnakumar Kunnath केके यांच्यासारखा अत्यंत प्रतिभावंत गायक असा अचानक कसा काय निघून जाऊ शकतो, हे मृत्यूचे सत्यच अद्याप त्यांच्या चाहत्यांना पचवता आलेले नाही.

 

अगदी पहिल्या वर्गात असल्यापासूनच केकेंना गाण्याची आवड. त्यांनी बी. कॉमची पदवी घेतली आणि एका हॉटेलमध्ये मार्केटिंग एक्झिकेटिव्ह म्हणून नोकरी करू लागले. मात्र, तिकडे मन रमेना. आठ महिन्यांतच नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णवेळ गाण्यावर लक्ष केंद्रित केले. शाळेत असताना त्यांनी एक 'जिंगल' केली होती. तोच धागा धरून जाहिरात क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकले. पण मायानगरी मुंबईला गेल्याशिवाय आपल्या भविष्याला उभारी मिळणार नाही, हे Krishnakumar Kunnath केके जाणून होते. शेवटी 1995 मध्ये विशाल भारद्वाज यांना गुलजार यांच्या 'माचिस' चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचे काम मिळाले. विशाल आणि केके यांची दोस्ती होती. या चित्रपटातील 'छोड आये हम वो गलियाँ' या गाण्याने शेवटी केके यांना ओळख मिळाली. अर्थात, त्यातील काहीच ओळी केके यांनी गायिल्या होत्या. पण त्यानंतर एक मार्ग सापडला आणि केके यांना आपली प्रतिभा जगाला दाखवणे सोपे झाले. 1999 मध्ये त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या दोन गोष्टी घडल्या. 'हम दिल दे चुके सनम' हे गाणे मिळाले आणि दुसरे, 'सोनी म्युझिक'ने उदयोन्मुख गायक म्हणून Krishnakumar Kunnath केके यांची निवड केली. त्यानंतर मात्र केके यांना मागे वळून बघावे लागले नाही.

 

'पल' या पहिल्या अल्बमनंतर Krishnakumar Kunnath केकेसाठी बॉलिवूडची दारं सताड मोकळी झाली. 'हम रहे या ना रहे कल...' हे याच अल्बममधील गाणं आहे. या गाण्याचे लेखन केके यांनीच केले होते. कोलकाता येथील त्यांच्या शेवटच्या जाहीर कार्यक्रमात त्यांनी या गाण्याची निवड करणे हा योगायोगही भावुक करणारा आहे. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप केे इस दिल से...' या गाण्याने केके यांना पहिला 'सिंगिंग बे्रक' मिळाला तर 2008 मधील 'ओम शांती ओम' चित्रपटातील 'आखों मे तेरी अजब सी...' या गाण्याने संगीत रसिकांच्या मनावर राज्य करून गेले. 'जरा सी दिल में दे जगह तू...' भट्ट कंपनीच्या 2008 मध्ये आलेल्या 'जन्नत' चित्रपटातील हे गाणेही केके यांच्या अत्यंत गाजलेल्या गाण्यांपैकी एक आहे. 'बचना ऐ हसीनों' या चित्रपटातील 'खुदा जाने...' हे गीत तर प्रदर्शित झाल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत पहिल्या क्रमांकावर 'ट्रेंड' करीत होते. याच गाण्याने त्यांना उत्तम गायनाचा 'फिल्म फेअर अवॉर्ड' मिळवून दिला होता. केके तरुणाईच्या गळ्यातील ताईत होते. अशी विख्यात व्यक्ती अचानक व अवेळी आपल्यातून निघून जाते तेव्हा अर्थात त्या त्या क्षेत्रात पोकळी निर्माण होत असते. अग्रगण्य गायकांच्या मांदियाळीत असलेल्या Krishnakumar Kunnath केके यांच्या जाण्याने असेच काहीसे झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

 
- संजय रामगिरवार
 

- 9881717832

Powered By Sangraha 9.0