उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर ; सहा ऑगस्टला होणार मतदान !

29 Jun 2022 17:35:21
नवी दिल्ली : देशाच्या (India) उपराष्ट्रपती पदाची निवडणुक सहा ऑगस्ट राेजी हाेणार आहे. याबाबतची घाेषणा आज २९ जून रोजी निवडणुक आयाेगाने (Election Commission) केली. येत्या पाच जूलैला निवडणुकीबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना 19 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. 
 
 

bhavan 
 
 
सध्या उपराष्ट्रपती कार्यरत असलेले व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाल दहा ऑगस्टला संपत आहे. त्यापुर्वी या पदासाठी निवडणूक घेणे आवश्यक असल्याने आज (बुधवार) मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या तारखेची घाेषणा करण्यात आली.
 
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम
 
पाच जूलै : निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी हाेणार.
19 जूलै : उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख.
20 जूलै : अर्जांची छाननी.
22 जूलै : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख.
सहा ऑगस्ट : आवश्यक असल्यास मतदान.
सकाळी दहा ते संध्याकाळी पाच
सहा ऑगस्ट : मोजणी.
Powered By Sangraha 9.0