मुंबईत इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, 11 जखमी; पीडितांना शिंदे गटाकडून मदतीचा हात

28 Jun 2022 11:25:57
मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे नाईक नगर भागात घडली आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर येथे 4 मजली इमारत कोसळली आहे.
या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींच्या मदतीला शिंदे गट धावून आला आहे. इमारत दुर्घटनेत अडकलेल्या काही लोकांना स्थानिक नागरिकांनी मदत केली. अग्निशामक दल, महानगरपालिका व पोलिस यंत्रणा यांच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे.
 
 

accident 
 
 
 
 
दुर्घटनेतील मृत नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची तर जखमी नागरिकांना 1 लाखांची मदत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सुचनेनुसार स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्या वतीने करण्यात येणार आहे. जखमींना उपचारासाठी राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींची नावे याप्रमाणे -
 
१. चैत बसपाल
२. संतोषकुमार गौड
३. सुदेश गौड
४. रामराज रहानी
५. संजय माळी
६. आदित्य कुशवाह
७. आबिद अन्सारी
८. गोविंद भारती
९. मुकेश मोरया
१०. अखिलेश माझिद
 
इमारत कोसळल्याची माहिती मिळताच आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
यासोबतच बचावकार्य आणखी तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, सर्व 4 इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र असे असतानाही येथे लोक राहत होते. सर्वांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे. आजूबाजूच्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून सकाळी आम्ही या इमारती रिकाम्या करून पाडण्याचे काम करू. मुंबईत कोसळण्याच्या मार्गावर असलेल्या इमारतींबाबत बोलताना मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, जेव्हा जेव्हा बीएमसी जुन्या इमारतींबाबत नोटीस बजावेल तेव्हा त्या रिकाम्या कराव्यात. अन्यथा अशा घटना घडत राहतील, जे अत्यंत दुर्दैवी आहे. यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
Powered By Sangraha 9.0