एकनाथ शिंदेंनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

28 Jun 2022 20:50:23
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी आता थेट मुख्यमंत्री यांना सवाल केला आहे. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय ? अशे खडे बोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहेत.
  
eknath shinde
 
 खासदार संजय राऊत व मंत्री आदित्य ठाकरे शिंदे समर्थक आमदार विरुद्ध अर्वाच्च भाषेत टीका टिप्पणी करत आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारला आहे. तुमचे पुत्र आमच्या वंदनीय बाळासाहेबांचा शिवसैनिकांबद्दल काहीही बोलत आहेत. त्यांचा बाप काढत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हिंदू विरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी तुम्ही याच आमदारांना समेटाची हाक देत आहात याचा अर्थ काय ? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना विचारला आहे
काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांची बंडखोर आमदारांविरोधात बोलताना जीभ घसरली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, गुवाहाटी असलेले बंडखोर आमदार मजा करताना दिसत आहेत. मात्र ती जिवंत प्रेत आहेत. त्यांचा आत्मा मेलेला आहे. त्यांची जिवंत प्रेत आता मुंबईत येतील. मग पोस्टमॉर्टम साठी विधानसभेत पाठवाव लागेल.
तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी देखील जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सात नंतर थरथरतात अशी टीका गुलाबराव पाटलांवर केली होती. आणि माफी मागा नाहीतर पराभूत करु असे आव्हानही शिंदे यांना दिले होते. आज उद्धव ठाकरे स्वतः आमदारांना निवेदन देऊन चर्चेने मार्ग काढू असे म्हणाले. यामुळे नक्की शिवसेनेत सुरू तरी काय आहे? हे कळणे अवघड झाले असून दरम्यान एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे.
Powered By Sangraha 9.0