सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांचं पहिलं ट्विट

27 Jun 2022 18:01:52
मुंबई  -  राज्याचे राजकारण ढवळून निघाले असून ते दिवसेंदिवस चर्चात्मक बनत आहे. कुठं बैठक तर कुठं निदर्शन, कुठं समर्थन तर कुठं विरोध असे चित्र सध्या राज्यभर दिसून येत आहे. यात भर आहे ट्विटची. रोज नवनवीन ट्विट समोर येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आता आणखी एक ट्वीट केलं आहे. हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..! असं त्यांनी म्हटलं आहे.
 
 
eknath shinde
 
 
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटास दिलासा मिळाला असून एकनाथ शिंदे गटाची गुवाहाटी येथे बैठक सुरू झाली आहे.  आता भाजपा अॅक्शन मोडमध्ये आहे. सरकारविरोधात भाजप अविश्वास ठराव मांडण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजपची बैठक होणार आहे. ठाकरे सरकारवर अविश्वास ठराव दाखल करण्याबाबत यावर चर्चा करणार असून आज भाजपच्या कोर कमिटी बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0