राष्ट्रपती निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज दाखल

    दिनांक : 24-Jun-2022
Total Views |
 
पीएम मोदी, नड्डा, शाह, गडकरींसह अनेकांची उपस्थिती
 
नवी दिल्ली :  Draupadi Murmu भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी आपला अर्ज दाखल केला. मुर्मू यांच्या नामांकनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व बडे नेते संसद भवनात पोहोचले आणि या खास प्रसंगाचे साक्षीदार झाले. मुर्मू यांचे संसदेत आगमन होताच भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांनी स्वागत केले. मुर्मू यांनी चार सेटमध्ये उमेदवारी दाखल केली. या ऐतिहासिक सोहळ्याला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.
 
 

murmu 
 
गांधी, आंबेडकरांना केले अभिवादन
 
उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी झारखंडचे माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू Draupadi Murmu यांनी बिरसा मुंडा, डॉ. भीमराव आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या संसदेच्या संकुलात असलेल्या पुतळ्याजवळ त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मते आणि नवीन पटनायक यांना मिळालेला पाठिंबा लक्षात घेता मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्यास त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती असतील. त्यांचा सामना विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याशी आहे. भाजपने आपल्या सर्व मित्रपक्षांना आणि एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना उमेदवारीसाठी आमंत्रित केले आहे. यावेळी राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.