गुवाहाटीत असलेल्या आमदारांनी मुंबईत यावे; सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करू - संजय राऊत

    दिनांक : 23-Jun-2022
Total Views |
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून शिवसेचे ४५ आमदार व १२ खासदार यांना घेवून गुवाहटी गेले आहे. पक्षाचं हित लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अस जर शिवसेनेचे बंडखोर आमदारांना वाटत असेल तर त्यांनी २४ तासाच्या आत परत यावे, त्यावर मागणींचा विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
 
 sanjay raut 
 
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी भावनिक संवाद साधला. तसेच मुंबईतील अधिकृत निवासस्थानही त्यांनी सोडले असून मातोश्रीवर ते परतले आहे. माझ्याच लोकांना मी नको असेल तर मला हे मुख्यमंत्री पद नको आहे. मात्र यासाठी आमदारांनी समोर येऊन बोलावे एवढंच माझं म्हणणं आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्येक आमदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतून बाहेर निघावं असे जर शिवसेनेचे बंडखोर आमदारांना वाटत असेल तर तुम्ही २४ तासाच्या आत परत या, तुमच्या मागण्यांचा नक्कीच विचार केला जाईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.