भारतीय कामगाराचा सिंगापूरमध्ये मृत्यू

    दिनांक : 23-Jun-2022
Total Views |

सिंगापूर : Indian worker सिंगापूरमध्ये एका बांधकामाच्या ठिकाणी क्रेनच्या दोन भागांमध्ये चिरडून एका ३२ वर्षीय भारतीय मजुराचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. '1 मंडई क्वारी रोड' येथे हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. कामगार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, "ह्वा यांग इंजिनिअरिंग कंपनीचा भारतीय कर्मचारी मोबाईल क्रेनच्या चेसिसच्या खाली असलेल्या टूलबॉक्समधून काहीतरी काढत असताना क्रेन उलटली. त्याची छाती क्रेनच्या दोन भागांमध्ये गाडली गेली.
 
 
 
police
 
 
 
 
प्रवक्त्याने कामगाराचे नाव सांगितले नसले तरी,खु टेक पुआट रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यू झाला. सिंगापूरमध्ये या वर्षात कामाच्या Indian worker ठिकाणी मृत्यूची ही 27 वी घटना असल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले. 2021 मध्ये कामाच्या ठिकाणी एकूण 37 लोकांचा मृत्यू झाला. एकट्या एप्रिल महिन्यात 10 जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान ली सिएन लूंग यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की कामाच्या ठिकाणी होणारे मृत्यू “स्वीकारण्यायोग्य नाहीत.